ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा ; आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब

Article image


मसुरेतील आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

Article image

     


मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कुल येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी लोकल कमिटी अध्यक्ष राजन परब, शाळा समिती अध्यक्ष सरोज परब, पंढरीनाथ नाचणकर तसेच शिक्षक, विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

Article image


'हर घर तिरंगा, प्रमाणेच मनमन तिरंगा,' अशी भावना आपण सर्वांनी ठेवणे आवश्यक आहे. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेले नसून हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक विरानी आपल्या आयुष्याचे बलिदान दिले आहे असे डाॅ. दीपक परब यांनी विशेष मार्गदर्शनपर संबोधन केले.

Article image


आपल्या देशाप्रती प्रेम आणि निष्ठा आपण सर्वांनी बाळगणे आवश्यक आहे. व्यसनापासून 'नेहमी' दूर राहा असे यावेळी अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब म्हणाले. कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सांगितिक कवायतीचे सादरीकरण केले. आभार सहाय्यक शिक्षक रमेश पाताडे यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स