ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर.



मालवण | प्रतिनिधी : कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवित मालवण येथील भारती घारकर व इतर मालवण, तसेच हडी व इतर गावातील नागरिकांची तब्बल ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी प्रमुख संशयित मुख्य आरोपी शुभम कृष्णात देशमुख (२७ ) राहणार- कोल्हापूर एकोंडी कागल याने काल दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी माननीय प्रथम वर्ग दंडाधिकारी न्यायालय मालवण, यांच्यासमोर माननीय सर्वोच्च न्यायालय येथे अटकपूर्व जामीन ना मंजूर झाल्यावर आत्मसमर्पण केले होते. त्याच दिवशी त्याला एक दिवसाची न्यायालयीन कोठडी मंजूर झाली होती. 


आज ११ ऑगस्ट २०२६ रोजी, तपासी अधिकारी प्रवीण कोल्हे यांनी सदर आरोपीला माननीय दंडाधिकारी न्यायालय मालवण येथे हजर केले व पोलीस कस्टडी रिमांड मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. आरोपी तर्फे आरोपीच्या वकील यांनी आरोपीचा गुन्ह्यामध्ये सहभाग नसल्याचा युक्तिवाद करत आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी यासाठी मागणी केली होती. दोन्ही पक्षांतर्फे युक्तिवाद ऐकल्यानंतर मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी आरोपी शुभम याला सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. याकामी सरकार पक्षातर्फे अभियोक्ता ॲड. उज्वला जाधव यांनी बाजू मांडली व फिर्यादीतर्फे ॲड. श्रीराम धोंडू चिंदरकर, ॲड तारिका चिंदरकर - कुबल, ॲड ऐश्वर्य मांजरेकर, ॲड. प्राजक्ता शिंदे (उच्च न्यायालय, मुंबई) यांनी सरकार पक्षास सहाय्य केले. सुनावणी अंती तपासकामात संशयितांची पोलीस कोठडीची आवश्यकता विचारात घेऊन तसेच गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन व आरोपीकडून सखोल तपास होणे आवश्यक असल्यामुळे मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी संशयितांला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ॲड. श्रीराम धोंडू चिंदरकर यांनी याबाबत पुष्टी केली आहे.


पुढील तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे करीत आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन.

लोकप्रिय टॅग्स