ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मालवणात मद्यपीडितांच्या मोफत मद्यमुक्तीच्या मदतीसाठी व माहितीसाठी अल्कोहोलीक्स ॲनाॅनीमस् (ए. ए.) संस्थेचा १ ऑक्टोबर रोजी जनजागरण स्टॉल.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवणात मद्यपीडितांच्या मोफत मद्यमुक्तीच्या मदतीसाठी व माहितीसाठी अल्कोहोलीक्स ॲनाॅनीमस् (ए. ए.) संस्थेचा १ ऑक्टोबर रोजी जनजागरण स्टॉल.

मालवणात मद्यपीडितांच्या मोफत मद्यमुक्तीच्या मदतीसाठी व माहितीसाठी अल्कोहोलीक्स ॲनाॅनीमस् (ए. ए.) संस्थेचा १ ऑक्टोबर रोजी जनजागरण स्टॉल. 


मालवण | प्रतिनिधी : मद्यमुक्तीसाठी संपूर्ण जगभरात मागील ९० वर्षांपासून १९० पेक्षा जास्त देशात एक लाखा पेक्षा अधिक ए. ए. समूहाद्वारे लाखो मद्यपीडितांना मोफत मद्यमुक्त करणाऱ्या आणि मद्यपीडितांच्या मद्यमुक्तीसाठी अहोरात्र मोफत कार्य करणाऱ्या अल्कोहोलीक्स ॲनाॅनिमस् (ए. ए.) या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे संपुर्ण महाराष्ट्रातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयात जनजागृती होत आहे. या अंतर्गत, १ ऑक्टोबर रोजी, मालवण ग्रामीण रुग्णालय येथे ए. ए. जनजागरण स्टॉल दिनांक  १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या दरम्यान लावण्यात येणार आहे.


ए. ए. मालवणच्या समूहांतर्फे शहरात मद्यपीडितांच्या मोफत मद्यमुक्तीसाठी  ए. ए. जनजागरण स्टॉल लावण्यात येणार असून या स्टॉल वर मद्यपीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियानां मोफत मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यात येणार असुन ए. ए. माहिती पत्रकाचे वाटप केले जाणार आहे. 


'दारू हि तुमची किंवा तुमच्या कुटुंबाची समस्या झाली असेल आणि दारू थांबवण्याची मनापासून इच्छा असेल तर..', स्टॉलला अवश्य भेट द्यावी असे आवाहन ए. ए. च्या वतीने करण्यात आले आहे. मद्यमुक्तीच्या अधिक माहितीसाठी कृपया 9860436765 / 9404165664 किंवा 9420331011 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अल्कोहोलीक्स ॲनाॅनीमस्, मालवण फेलोशिपतर्फे करण्यात येत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स