ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने पूरग्रस्तांना मदत.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने पूरग्रस्तांना मदत.

प्रकाशन: 29 Sep 2025 09:28 PM
वाचन संख्या 68

अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने पूरग्रस्तांना मदत.

                    

मसुरे | प्रतिनिधी : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने महापूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सहाय्यता कक्षास स्थानिक व जिल्हा आपत्ती प्रशासनाच्या सुचनेनुसार गहू, तांदूळ, साखर, रवा इत्यादी प्रकारचे धान्य कीट व मंदिरात वापरलेले शाल, सोवळे, उपरणे इत्यादी, श्री स्वामी समर्थांच्या कृपावस्त्रे स्वरुपातून मदतीचा हात पुढे करण्यात आल्याची माहिती मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. सलग एक महिन्यापासून शहर व जिल्ह्यात सातत्याने पडत असलेल्या पावसाचा शेतकरी वर्गास व सर्वसामान्य नागरीकाना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभुमीवर या नैसर्गिक आपत्ती काळात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या धान्य स्वरुपातील मदतीचा हातभार लागणार आहे. धान्य स्वरुपातील ही देवस्थानची मदत देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे अध्यक्षतेखाली  तुळजापूर मंदिर समिती येथील पी. एस. आय.प्रशांत कुलकर्णी यांचे हस्ते धान्य किटचे पूजन करून चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते धान्य कीट प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली. 

Article image


यावेळी पुणे वाहतुक नियंत्रण विभाग पोलीस खात्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री भोसले, मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, चंद्रकांत गवंडी, संतोष पराणे, श्रीशैल गवंडी, शिवशरण अचलेर, गिरीश पवार, बाळासाहेब एकबोटे, अंकुश केत, चित्तरंजन अगरथडे, श्रीकांत मलवे, गणेश इंगळे, सागर गोंडाळ, आकाश चुंगीकर, गवळी, शंकर मलवे, समर्थ स्वामी, सागर दळवी, ओंकार महाडीक, सचिन कटकधोंड

इत्यादी उपस्थित होते.


नैसर्गिक आपत्ती व संकटकाळात श्री स्वामी समर्थांच्या आशिर्वादाने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीकडून प्रशासनास नेहमीच मदतीचा हातभार लावण्यात येतो. गतकाळातील कोरोना सारख्या भिषण संकटात मंदिर समितीने प्रशासनास केलेले सहकार्य व मदत सर्वानी पाहीलेच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंदिर समितीचा सामाजिक सहकार्यात नेहमीच वाटा राहिलेला आहे. सद्याच्या पुरग्रस्तांना मंदीर समितीच्या या मदतीचा लाभांश नक्कीच दिलासा देणारा ठरेल असे श्री. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोट चेअरमन महेश कल्याणराव इंगळे यांनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स