जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी' सत्कार.
जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी' सत्कार.
बांदा | ब्यूरो न्यूज : व्हिओएम तथा व्हाईस ऑफ मिडिया कोअर राज्य कमिटीच्या सदस्यपदी तसेच शिवशंभू प्रतिष्ठानच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार जय भोसले यांचा बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने अभिनंदन पर सत्कार करण्यात आला. बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्याहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जय भोसले यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी उपसरपंच रत्नाकर आगलावे, माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ आबा धारगळकर, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, सौ. रुपाली शिरसाठ, सौ.श्रेया केसरकर, सौ. दीपलक्ष्मी पटेकर, प्रशांत बांदेकर उपस्थित होते. उपस्थितांनी, जय भोसले भूषवित असलेल्या या 'दुहेरी' जबाबादार भूमिका व त्यांच्या योगदानासाठी विशेष अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)