ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम.

व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम.

Article image


मुंबईतील अंतिम फेरीच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना चेअरमन व्हिक्टर डांटस तसेच प्राचार्य डाॅ. शिल्पा मर्गज यांच्यासह प्राध्यापक व मार्गदर्शकांच्या शुभेच्छा.  


कुडाळ | प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठाचा ५९ वा आंतर महाविद्यालयीन 'युवा महोत्सव २०२६-२७' शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे उत्साहात संपन्न झाला. यामध्ये कुडाळ येथील व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा प्रकारात उल्लेखनीय यश संपादन केले. 


या स्पर्धेत व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजच्या श्रेया मयेकर यांनी हिंदी एकपात्री नाट्य सादरीकरण प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला तर मराठी एकपात्री सादरीकरणात उत्तेजनार्थ बक्षिस मिळवत अंतिम फेरीसाठीची पात्रता प्राप्त केली. 


वादविवाद इंग्रजी तथा 'इंग्लिश डिबेट' या प्रकारात सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. याद्वारे व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजने इंग्रजी डिबेट प्रकारात सलग पाचव्या वर्षी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. 

'वादविवाद मराठी' तथा 'मराठी डिबेट' प्रकारात हर्षाली पाताडे व भक्ती खटावकर यांनी उत्तेजनार्थ बक्षिस प्राप्त अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. 


हिंदी कथाकथन प्रकारात रोझॅन ख़ान यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर मराठी कथाकथन प्रकारात गरीमा काजरेकर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त करत अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. 'कोलाज निर्मिती' प्रकारात भक्ती खटावकर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त करत अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. 'मराठी वक्तृत्व' प्रकारात अथर्व शेवडे यांनी उत्तेजनार्थ बक्षिस प्राप्त करत अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. 


सर्व सहभागी तसेच अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवलेल्या होतकरुंचे अभिनंदन करत, मुंबईतील अंतिम फेरीच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना चेअरमन व्हिक्टर डांटस तसेच प्राचार्य डाॅ. शिल्पा मर्गज यांच्यासह प्राध्यापक व मार्गदर्शकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स