ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
देऊळवाडा स्मशानभूमीतील शवदाहिनी योग्य पद्धतीत बसवली.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

देऊळवाडा स्मशानभूमीतील शवदाहिनी योग्य पद्धतीत बसवली.

देऊळवाडा स्मशानभूमीतील शवदाहिनी योग्य पद्धतीत बसवली. 

 

शहरप्रमुख दिपक पाटकर व माजी नगरसेवक जगदीश गांवकर यांचा पुढाकार.


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील देऊळवाडा स्मशानभूमी येथे बसवण्यात आलेली शवदाहिनी अयोग्य पद्धतीने बसवण्यात आल्याने समस्या निर्माण होत होत्या. याबाबत नागरिकांच्या मागणीनुसार शिवसेना शहरप्रमुख दिपक पाटकर व माजी नगरसेवक जगदीश गांवकर यांनी शवदाहिनी योग्य पद्धतीने बसवून दिली आहे अशी माहिती मिळत आहे.


माजी नगरसेवक दिपक पाटकर व जगदीश गांवकर यांनी स्वखर्चातून हे काम पूर्ण केले असून देऊळवाडा व साळसकर स्मशानभूमी येथे नव्याने लोखंडी शवदाहिनी बसवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे अशी माहिती मिळत आहे

Article image

नागरिकांच्या मागणीनुसार काम झाले पाहिजे यासाठी प्रयत्न नेहमीच राहील. नागरिकांच्या मागणीनुसार मालवण परिसरातील विकास कामे आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात पूर्ण केली जातील, असे दिपक पाटकर यांनी सांगितले असल्याची माहिती मिळत आहे. 


रविवारी शवदाहिनीचे काम पूर्ण करून घेण्यात आले. यावेळी बाबू कांदळकर, बाबू गावकर, कवठकर, किरण चव्हाण, बापू हडकर, प्रभाकर देऊलकर, बंड्या फणसेकर, सुहास वालावलकर, शरद गांवकर, सुभा मालवणकर, प्रमोद गांवकर, कमा गांवकर, जितू मराळ, प्रमोद मराळ, बाबू बगाड, पराग चव्हाण, अमोल चव्हाण, प्रमोद डीचोलकर, श्याम आजगावकर, इब्राह्मपुरकर, विनायक खानोलकर, राजू किर, अर्जुन चव्हाण, संतोष इब्राहमपुरकर, रोहन वाळके, हरेश फणसेकर, नामदेव घाडी, नितीन बांदेकर, महेश बांदेकर, महेश हडकर आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स