ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
शंभर लेखकांना लिहीते केल्याचा आनंद पुरस्काराने विशेष साजरा झाला : सुरेश ठाकूर
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

शंभर लेखकांना लिहीते केल्याचा आनंद पुरस्काराने विशेष साजरा झाला : सुरेश ठाकूर

शंभर लेखकांना लिहीते केल्याचा आनंद पुरस्काराने विशेष साजरा झाला : सुरेश ठाकूर 



सुरेश ठाकूर संपादीत 'बीज अंकुरे'ला कोमसाप केंद्रीय पुरस्कार जाहीर.

Article image



आचरा | प्रतिनिधी : कोमसाप मालवण अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्य जाणकार लेखक श्री. सुरेश शामराव ठाकूर यांनी संपादीत केलेल्या व कोमसाप मालवणच्या १८ ललित लेखकांनी साकारलेल्या 'बिज अंकुरे अंकुरे' या पुस्तकाला कोमसापचा संपादनाचा पहिला पुरस्कार नुकताच जाहीर झालेला आहे. सदर पुरस्काराचे वितरण ८ नोव्हेंबर २०२५ रोजी रत्नागिरी येथील कवितेची राजधानी मालगुंड येथे सन्मानपूर्वक होणार आहे. सदर पुस्तकात कोमसाप मालवणच्या अनुक्रमे रश्मी रामचंद्र आंगणे, वर्षाराणी बलवंत अभ्यंकर, पूर्वा मनोज खाडीलकर, तेजल गुरुनाथ ताम्हणकर, ऋतुजा राजेंद्र केळकर, आदिती धोंडी मसूरकर, शिवराज विठ्ठल सावंत, मधुरा महेश माणगावकर, रसिका राजेंद्र तेंडोलकर, दिव्या दीपक परब, वंदना नारायण राणे, देवयानी त्रिंबक आजगावकर, विठ्ठल लक्ष्मण लाकम, वैजयंती विद्याधर करंदीकर, नारायण यशवंत धुरी, सदानंद मनोहर कांबळी, अशोक कांबळी, गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर या १८ लेखकांनी आपले १४६ ललित लेख साकारले असून सदर पुस्तक 'सत्त्वश्री प्रकाशन रत्नागिरी' यांनी प्रकाशित केलेले आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ लेखक रविंद्र वराडकर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभलेली आहे. या पुस्तकाला आशीर्वाद देताना पद्मश्री मधु मंगेश कर्णिक म्हणतात की 'सुरेश ठाकूर आणि संपादित केलेला हा ग्रंथ म्हणजे केवळ कोकणातच नव्हे तर महाराष्ट्राला अनुकरणीय ठरावा असाच आहे. मालवण कोमसाप शाखेच्या या उपक्रमाचे मी मनापासून कौतुक करतो.'

Article image

   

या पुरस्काराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सुरेश ठाकूर म्हणाले की गेली सहा वर्षे अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी सिंधुसाहित्यसरिता (चरित्र ग्रंथ), बीज अंकुरे अंकुरे (ललित लेख संग्रह), ये गं ये गं सरी (कविता संग्रह) या तीन पुस्तकांच्या माध्यमातून कोमसापच्या १०० पेक्षा जास्त लेखकांना लिहिते केले. या पुरस्कारमुळे आनंद विशेष साजरा झाला आहे. आज बीज अंकुरे अंकुरे पुस्तकाची जी प्रशंसा झाली, ते माझे स्वतःचे नसून कोमसाप मालवणच्या लेखक सदस्यांचे आहे हे विशेष...! मी संपादक म्हणून निमित्त मात्र आहे अशी प्रांजळ प्रतिक्रिया सुरेश ठाकुर यांनी दिली आहे.

Article image

   

हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणच्या सर्व सदस्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स