साहित्यिक वैशाली पंडित यांच्या 'मंत्रभूल' पुस्तकाला कोमसापचा पुरस्कार जाहीर.
साहित्यिक वैशाली पंडित यांच्या 'मंत्रभूल' पुस्तकाला कोमसापचा पुरस्कार जाहीर.
मालवण : कोकण मराठी साहित्य परिषदेचे वाड्मयीन पुरस्कार जाहीर झाले असून यात सिंधुदुर्ग मालवणच्या साहित्यिक वैशाली पंडित यांच्या 'मंत्रभूल' या पुस्तकाला 'कै.अनंत काणेकर ललितगद्य प्रथम पुरस्कार मिळाला आहे. केंद्रीय अध्यक्ष सौ. नमिता किर यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे संपन्न झालेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
मंत्रभूल हे सकाळ प्रकाशनाकडून प्रकाशित झालेले पुस्तक आहे. यात वैशाली पंडित यांच्या खास शैलीतील विविध विषयांवर लिहिलेले ललित लेख समाविष्ट आहेत. या पुस्तकाला चतुरस्त्र अभिनेते आणि लेखक श्री. समीर चौघुले यांची प्रस्तावना आहे तर सुप्रसिद्ध कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर यांची पाठराखण लाभली आहे.
न्हावेली येथील शब्दसखा समूहाच्या वतीने मंत्रभूल पुस्तकाचा वाचकार्पण सोहळा संपन्न झाला होता. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेपासून साहित्यिक योगदान देत असलेल्या वैशाली पंडित यांचे, शब्दसखा समूहातील सदस्य तसेच मराठी साहित्य वर्तुळातून आणि विविध क्षेत्रातून विशेष अभिनंदन होत आहे.
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल समूहच्या वतीने, मुख्य संचालक श्री. विजय रावराणे यांनी वैशाली पंडित यांचे अभिनंदन केले आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय लेखन सदराची तडाखेबंद शतकपूर्ती..!
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय ल...
लेखक सुरेश ठाकूर यांचे पुस्तक संवेदनशील 'प्रतिभे'सह 'शब्दांच्या पलिकडे'...!
शास्त्रीय गायक महेश काळे यांच्या सूरांनी उजळली नेरूरमधली 'स्वर संध्या..!'
शास्त्रीय गायक महेश काळे यांच्या सूरांनी उजळ...
आचरे येथे कथामाला कार्यकर्त्यांचा सत्कार.
आचरे येथे कथामाला कार्यकर्त्यांचा सत्कार.कथ...
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.