ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांचे कणकवलीत जोरदार स्वागत…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांचे कणकवलीत जोरदार स्वागत…

प्रकाशन: 30 Oct 2021 03:51 PM
वाचन संख्या 35

कणकवली | उमेश परब : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,ना.जयंत पाटील यांचे पटवर्धन चौकात नगरसेवक अबिद नाईक तर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा बँक संचालक आर.टी. मर्गज,जिल्हा उपाध्यक्ष अंनत पिळणकर व सर्व पदाधिकाऱ्यांनी मुद्रा कमर्शियल येथे ढोल ताश्यांच्या गजरात,फटाक्यांची आतषबाजी करुन जोरदार घोषणाबाजीने स्वागत करण्यात आले. यावेळी आ.शेखर निकम,माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,जिल्हाध्यक्ष अमित सामंत,राष्ट्रवादी युवती महाराष्ट्र अध्यक्ष सक्षणा सलगर हे प्रमुख नेते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो,शरद पवार साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है..,जयंत पाटील साहेब..आगे बढो हम तुम्हारे साथ है..अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सिंधुदुर्ग दौऱ्यावर असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
यावेळी काका कुडाळकर,सागर वारंग,रुपेश जाधव, निखिल गोवेकर,विनोद मर्गज, अभिनंदन मालंडकर,संदेश मयेकर,समीर आचरेकर,राजेश पाताडे,देवेंद्र जाधव,आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स