ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तळेरे येथे अनोखी पणती कार्यशाळा उत्साहात..

तळेरे येथे अनोखी पणती कार्यशाळा उत्साहात..

प्रकाशन: 30 Oct 2021 12:00 PM
वाचन संख्या 32

70 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

कलेतून उद्योजकता संकल्पनेला पोहोचवण्यावर आयोजकांचा भर..!

कणकवली | उमेश परब : तळेरे येथील श्रावणी कंप्युटर एज्युकेशन आणि मेधांश कंप्युटर इन्स्टिट्यूट यांच्यावतीने आयोजित केलेल्या पणती कार्यशाळेला उदंड प्रतिसाद मिळाला. ही कार्यशाळा गुरुवारी तळेरे येथे झाली. त्यावेळी पंचक्रोशीतील 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
लहान मुलांसाठी आयोजित केलेल्या पणती कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला कार्यशाळेचे मार्गदर्शक पी. एन. काणेकर, डॉ. अभिजित कणसे, पत्रकार उदय दुदवडकर, निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर, वैभव मुद्राळे, सतिश मदभावे, निकेत पावसकर, श्रावणी कंप्युटर एज्युकेशनच्या श्रावणी मदभावे, मेधांश कंप्युटर इन्स्टिट्यूटच्या रिना दुदवडकर आदी उपस्थीत होते. 
दिवाळी जवळ आल्याने आपल्या मुलांमधिल कला कौशल्याला वाव मिळावा. आणि मोबाइल पासुन थोडावेळ लांब जाऊन वेगळी मजा अनुभवण्यास मिळावी, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कलेतून उद्योजकता निर्माण होणे ही संकल्पना स्पष्ट केले. आधुनिक रंगीत परिवर्तित प्लॅस्टिकच्या आणि मेणाच्या पणत्यांनी दिवाळी साजरी करण्यापेक्षा पारंपरिक मातीच्या पणत्यांचा वापर करावा असे श्रावणी मदभावे म्हणाल्या. यावेळी मार्गदर्शक पी. एन. काणेकर यांनी प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. 
या कार्यशाळेत सहभागी मुलांना पणत्या देण्यात आल्या. त्या मुलांनी आपल्या आवडीनुसार आणि कलेनुसार आकर्षक रंगवल्या. या सर्व पणत्या 31 ऑक्टोबरला तळेरे येथे होणार्या कंदिल महोत्सवात विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. या कार्यशाळेला प्रणिल शेट्ये, प्रमोद कोयंडे, दिपक पांचाळ आणि पालकांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स