कुडाळ येथे कोमसापची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
कुडाळ येथे कोमसापची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
केंद्रीय अध्यक्षपदी नमिता कीर तर कार्याध्यक्षपदी डॉ. प्रदीप ढवळ यांची फेरनिवड.
कुडाळ | ब्यूरो न्यूज : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विश्वस्त व केंद्रीय कार्यकारिणी सन २०२५ ते २०२८ ची निवड कुडाळ येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत जाहीर करण्यात आली. कोकण मराठी साहित्य परिषद संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या सुचनेनुसार केंद्रीय अध्यक्षपदी सौ. नमिता रमेश किर तर कार्याध्यक्षपदी डॉ. प्रदीप ढवळ यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
विश्वस्त मंडळामध्ये मंत्री डॉ. उदय सामंत, संजय केळकर, श्री. अनुप कर्णिक, प्रा. एल. बी. पाटील, श्रीम. रेखाताई नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे.
कोमसाप केंद्रीय अध्यक्षपदी नमिता रमेश कीर (रत्नागिरी), केंद्रीय कार्याध्यक्षपदी प्रा. डॉ. प्रदीप जनार्दन ढवळ (ठाणे), केंद्रीय कार्यवाहपदी माधव अंकलगे (मालगुंड), प्रा. दीपा ठाणेकर (ठाणे), प्रकाश दळवी (रत्नागिरी) यांची निवड झाली.
केंद्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून श्री. मंगेश मस्के, श्री. रुजारिओ पिंटो, श्री. आनंद शेलार, श्री. बाळासाहेब लबडे, श्री. संजय गुंजाळ, श्री. गणेश कोळी, श्री. मोहन भोईर, रूपंचंद भगत, श्रीम. विद्या प्रभू, जगदीश भोवड, तुकाराम कांदळकर, योगेश जोशी, प्रवीण दवणे, सुहास राऊत यांची निवड करण्यात आली.
यावेळी केंद्रीय साहित्य संमेलन समिती केंद्रीय अध्यक्ष व केंद्रीय कार्याध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली. झपुर्झा प्रकाशन समिती पदी सौ. नमिता कीर, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन व पुस्तकांचे गाव समिती पदी श्री. गजानन पाटील, महिला साहित्य संमेलन समिती पदी सौ. उषा परब व सौ. वृंदा कांबळी, युवाशक्ती पदी दक्षिण कोकण (रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्हा) श्री. अरुण मोर्ये, उत्तर कोकण (मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई) नाट्य समिती पदी डॉ. अनिल बांदिवडेकर, श्री. किरण येलये, श्री. मंदार टिल्लू, श्री. अमेय धोपटकर, समन्वय समिती रवींद्र आवटी, जयेंद्र भाटकर, अनंत वैद्य, अशोक बागवे, चंद्रमोहन देसाई, विधी व कायदा समिती पदी ॲड. स्वाती दिक्षीत, लेखा परीक्षण समिती पदी श्री. मधुकर टिळेकर, कोमसाप भवन बांधकाम समिती श्री. गजानन पाटील, श्री. माधव अंकलगे, श्री. प्रकाश दळवी, श्री. संदीप वालावलकर आदींची निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी वार्षिक सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. या सभेला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कर्जत, ठाणे, पनवेल, नवी मुंबई, मुंबई आदी भागातील जिल्हाध्यक्ष, सभासद उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
शास्त्रीय गायक महेश काळे यांच्या सूरांनी उजळली नेरूरमधली 'स्वर संध्या..!'
शास्त्रीय गायक महेश काळे यांच्या सूरांनी उजळ...
कोमसाप ललित गद्य प्रथम पुरस्कार प्राप्त मालवणच्या ज्येष्ठ लेखिका वैशाली पंडित यांचा कोमसाप कुडाळ शाखेच्या वतीने ७ डिसेंबर रोजी सत्कार.
कोमसाप ललित गद्य प्रथम पुरस्कार प्राप्त मालव...
साहित्यिक वैशाली पंडित यांच्या 'मंत्रभूल' पुस्तकाला कोमसापचा पुरस्कार जाहीर.
कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात.
कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्सा...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.