ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
कोकणातील मान्यवर कवींची काव्य मैफिल उत्साहात.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

कोकणातील मान्यवर कवींची काव्य मैफिल उत्साहात.

कोकणातील मान्यवर कवींची काव्य मैफिल उत्साहात. 


श्री शिवाजी वाचन मंदिरच्या वतीने आम्ही मालवणी व दत्तमंदिर भरड मालवण यांच्या सहयोगाने संपन्न कार्यक्रम.


मालवण : श्री शिवाजी वाचन मंदिरच्या वतीने अभियान आम्ही मालवणी व दत्तमंदिर भरड मालवण यांच्या सहयोगाने कोकणातील मान्यवर कवींची काव्य मैफिल संपन्न झाली. शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी श्री दत्त मंदिर भरड, मालवण येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर श्री शिवाजी वाचन मंदिरचे अध्यक्ष डॉ. सुभाष दिघे, सुप्रसिद्ध कवी रुजारिओ पिंटो, प्रा. एल. बी. पाटील, काॅम्रेड गोपाळ शेळके, मच्छिंद्र म्हात्रे आदी उपस्थित होते. 

Article image


श्री देवी सरस्वतीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कवी जनार्दन संताने यांनी ईशस्तवन केले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवर कवींचे गुलाबपुष्प व स्मरणिका देऊन स्वागत करण्यात आले. प्रा. एल. बी. पाटील यांनी कोमसाप रायगडच्या वतीने डॉ. सुभाष दिघे व रुजारिओ पिंटो यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. 

Article image


यानंतर रुजारिओ पिंटो, प्रा. एल. बी. पाटील, मच्छिंद्र म्हात्रे, काॅम्रेड ॲड. गोपाळराव शेळके, लवेंद्र मोकल, रामचंद्र म्हात्रे, अजय शिवकर, रमण पंडित, जनार्दन संताने, गजानन म्हात्रे, नरेश पाटील व गोपीनाथ ठाकूर या कवींनी काव्य सादरीकरण केले. यावेळी तुळशीदास पाटील यांनी ढोलकीची साथ दिली. 



यावेळी मान्यवरांसह ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित, चारुशीला देऊलकर, स्मिता बर्डे, वासुदेव काजरेकर, रत्नाकर कोळंबकर, श्रीधर काळे, कमल बांदकर, निशा बिडये, ग्रंथपाल मानसी दुधवडकर, साक्षी सावंत व साहित्यप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुभाष दिघे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ऋतुजा केळकर यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स