सॅटर्डे क्लब कोल्हापूर रिजनतर्फे महिलांना औद्योगिक प्रशिक्षण.
सॅटर्डे क्लब कोल्हापूर रिजनतर्फे महिलांना औद्योगिक प्रशिक्षण.
उद्योगिनी संस्थेच्या वतीने चेअरपर्सन सौ. पल्लवी गुंजाळ यांनी व्यक्त केले समाधान.
कोल्हापूर | ब्यूरो न्यूज : सॅटर्डे क्लब कोल्हापूर रिजन अंतर्गत 'उद्योगिनी' या महिलांसाठी असलेल्या उपक्रमाची नियमित बैठक मंगळवार, १६ सप्टेंबर रोजी संपन्न झाली. यावेळी श्री. चक्रधर कदम यांनी शॅम्पू आणि बहुगुणी क्लीनर लिक्विड तयार करण्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले.
यावेळी श्री. कदम यांनी उत्पादन ते विक्री तसेच व्यवसायात येणारे अडथळे याचे मार्गदर्शन केले. येणाऱ्या काळात ते या महिलांना दिवाळीसाठी उटणे, साबण, सुगंधित अगरबत्तीचे प्रात्यक्षिकासहित प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षणामुळे एखाद्या महिलेला स्वतः चा व्यवसाय उभा करण्यास मदत होईल. या प्रशिक्षणासाठी सौरभ सहस्रबुद्धे यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी उद्योगिनीच्या वतीने चेअरपर्सन सौ. पल्लवी गुंजाळ तसेच सचिव सौ. सोनाली जामसंडेकर, समन्वयक सौ. सोनाली गायकवाड यांनी सॅटर्डे क्लब यांचे आभार मानले.
या औद्योगिक प्रशिक्षण तथा मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त होत आहे अशी माहितीपर प्रतिक्रिया, उद्योगिनी चेअरपर्सन सौ. पल्लवी गुंजाळ यांनी डिजीटल सामाजिक मंचावरून व्यक्त केली आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
पनवेल येथील अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाच्या चिंतन शिबीरात महासंघ अध्यक्ष तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांचे मार्गदर्शनपर संबोधन.
पनवेल येथील अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाच्...
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांची सामाजिक कार्यकर्ते तथा कणकवलीचे ज्येष्ठ व्यापारी राजेंद्र पेडणेकर व संजय मालंडकर यांनी घेतली भेट.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांची सामाजिक क...
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये 'मार्केट डे' उत्साहात.
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये 'मार्केट ...
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व उप नगराध्यक्ष सुशांत नाईक यांना अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतच्या मालकीच्या जागेतील जेष्ठ व्यापारी तसेच व्यावसायिकांची भेट आणि निवेदन.
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व उप...