ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
मालवण मधील व्यापाऱ्याच्या प्रामाणिकपणाची प्रशंसा.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवण मधील व्यापाऱ्याच्या प्रामाणिकपणाची प्रशंसा.

प्रकाशन: 20 Sep 2025 06:20 PM
वाचन संख्या 247

मालवण मधील व्यापाऱ्याच्या प्रामाणिकपणाची प्रशंसा. 


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण बाजारपेठ येथील व्यापारी बबन तळवडेकर यांना रस्त्यात सापडलेले मोठी रोख रक्कम असलेले पैशाचे पाकीट तळवडेकर यांनी ओळख पटवून मालकास सुपूर्द केले. मालवण व्यापारी संघातील व्यापारी सदस्यांचा प्रामाणिकपणा पुन्हा एकदा जनतेने अनुभवला.

Article image


मालवण शहर बाजारपेठ येथील व्यापारी बबन तळवडेकर यांना रस्त्यात एक पैश्याचे पाकीट सापडले. त्यात रोख रक्कम १५ हजार, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक एटीएम, क्रेडिट कार्ड होते. बबन तळवडेकर यांनी पाकीट मधील आधार कार्ड वरून त्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला. मुंबई येथील एक सेवानिवृत्त व्यक्ती जे आता मालवण परिसरात राहतात त्या सुनीलकुमार या व्यक्तीचे हे पाकीट असल्याची पूर्ण खात्री झाली.


त्यानंतर बबन तळवडेकर यांनी मालवणचे ज्येष्ठ व्यापारी नानाशेठ पारकर, हेमंत शिरपुटे, जयू शिरपुटे, हर्षल बांदेकर, उमेश मयेकर, मयू पारकर यांच्या उपस्थितीत सुनील कुमार यांना पाकीट सुपूर्द करण्यात आले आहे अशी माहिती मिळत आहे. सुनील कुमार यांनी बबन तळवडेकर यांची कृतज्ञता व्यक्त केली. बबन तळवडेकर यांच्या प्रामाणिकपणा बद्दल व्यापारी वर्गाकडून तसेच सर्व स्तरातून प्रशंसा करण्यात येत आहे.


सौजन्य | मालवण ब्यूरो

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...

11 Aug 2026 282

लोकप्रिय टॅग्स