मालवण तालुक्यात मर्चंट नेव्ही विषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न.
मालवण तालुक्यात मर्चंट नेव्ही विषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न.
कॅप्टन मकरंद सरदेसाई यांचे माहितीपर मार्गदर्शन तर रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय अध्यक्ष विजय केनवडेकर यांचे विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मनोगत.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील स. का. पाटील महाविद्यालय तसेच रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय येथे रहेमान इन्स्टिट्यूटच्या वतीने मर्चंट नेव्ही संदर्भातील मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.
जगातील सर्वात स्वस्त वाहतूक पद्धत म्हणजे सागरी मार्गे होणारी वाहतूक असून या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध करिअरच्या संधींची सविस्तर माहिती कॅप्टन मकरंद सरदेसाई यांनी विद्यार्थ्यांना दिली. महिलांसाठी या क्षेत्रात किती संधी उपलब्ध आहेत, सेवा करताना महिलांची सुरक्षितता, प्रशिक्षणासाठी विशेष सवलती अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
दहावीनंतर उपलब्ध असणारे कोर्सेस, बारावीनंतर होणारी सीईटी परीक्षा, बी.एस्सी. नंतरचे वेगळे कोर्सेस या विषयावर देखील त्यांनी मार्गदर्शन केले. मर्चंट नेव्हीमध्ये प्रवेश घेतल्यावर प्रशिक्षणापासून जहाजावर जाणे व परत येईपर्यंतचा सर्व खर्च कंपनीकडून केला जातो, याची माहिती त्यांनी दिली. या क्षेत्रात करिअर करताना विद्यार्थ्यांना जग पाहण्याची संधी मिळते आणि कमी कालावधीत आर्थिक प्रगती साधता येते,असे त्यांनी विशेष नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलवाहतुकीच्या प्रोत्साहनासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे नवे बंदर प्रकल्प, बंदरांचे आधुनिकीकरण यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये करिअर करून स्वतःची आर्थिक उन्नती साधावी, यासाठी संस्था नेहमीच सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे, असे रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी मनोगतात म्हटले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य डॉ. ठाकूर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. उज्वला सामंत यांनी केले तर कार्यक्रमाला प्रा. हसन खान व इतर प्राध्यापकांचे विशेष सहाय्य लाभले. कार्यक्रमानंतर पालक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये 'मार्केट डे' उत्साहात.
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये 'मार्केट ...
भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न.
गाबीत समाज जातीच्या दाखल्याबाबत गाबीत समाज शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट व चर्चा आणि निवेदन.
गाबीत समाज जातीच्या दाखल्याबाबत गाबीत समाज श...