ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
मालवणात १८ सप्टेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवणात १८ सप्टेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर.

प्रकाशन: 17 Sep 2025 03:50 PM
वाचन संख्या 105

मालवणात १८ सप्टेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर. 


श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय, मालवण यांचे संयुक्त आयोजन. 


मालवण | ब्यूरो न्यूज : डोळ्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि गरजू लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सोमवार पेठ, मालवण आणि डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर गुरुवार, १८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत श्री हनुमान मंदिराच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.


या शिबिरात संगणकाद्वारे नेत्र तपासणी, अत्याधुनिक संगणकीय प्रणाली वापरून डोळ्यांची अचूक तपासणी केली जाईल. यामुळे दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींना योग्य नंबरचा चष्मा निवडण्यात मदत होईल. मोतीबिंदू आणि इतर डोळ्यांच्या आजारांचे निदान, तज्ज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांची सखोल तपासणी केली जाईल. मोतीबिंदू (Cataract), काचबिंदू (Glaucoma) आणि डोळ्यांच्या इतर गंभीर आजारांचे योग्य निदान करून त्यावर योग्य उपचारासाठी मार्गदर्शन केले जाईल. ज्या रुग्णांना मोतीबिंदूची समस्या असल्याचे निदान होईल, त्यांच्यासाठी डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय, मालवण शाखेत दर शनिवारी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी २०% विशेष सवलत दिली जाणार आहे. ज्या लोकांना चष्म्याची गरज असेल, त्यांना २०% सवलतीच्या दरात चष्मा उपलब्ध करून दिला जाईल. महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत पात्र असलेल्या सर्व शिधापत्रिका (रेशन कार्ड) धारकांसाठी डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय, वेंगुर्ला शाखेमध्ये मोतीबिंदू सोडून इतर डोळ्यांच्या आजारांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याची सोय अशा प्रमुख तपासण्या आणि सुविधा देण्यात येणार आहेत अशी माहिती मिळत आहे. 


श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि डॉ. गद्रे नेत्र रुग्णालयाच्या या संयुक्त उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. तरी मालवण आणि परिसरातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि डोळ्यांच्या तपासणीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी आणि तपासणीसाठी श्री हनुमान मंदिर, सोमवार पेठ, मालवण येथे वेळेवर उपस्थित रहावे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स