मालवणात मर्चंट नेवीच्या मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.
मालवणात मर्चंट नेवीच्या मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.
रहेमान इन्स्टिट्यूट, नवी मुंबई यांच्या विशेष टीमचे मार्गदर्शन.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर यांचा पुढाकार तर गवर्निंग काऊन्सील सदस्य विजय केनवडेकर यांचे विद्यार्थ्यांना लाभ घ्यायचे आवाहन.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील विद्यार्थ्यांना करिअरच्या नवीन संधींबाबत मार्गदर्शन मिळावे या हेतूने रहेमान इन्स्टिट्यूट, नवी मुंबई यांची टीम मालवण येथे गुरुवार, १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात मर्चंट नेव्हीवरील मोफत मार्गदर्शन शिबिर घेणार आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मार्फत मागील दोन वर्षांत अशाच मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात आले होते. त्याचा लाभ घेऊन अनेक विद्यार्थी यशस्वीरित्या मर्चंट नेव्हीमध्ये दाखल झाले आहेत. याच धर्तीवर यावर्षीदेखील हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात विद्यार्थ्यांना, मर्चंट नेवी म्हणजे काय, प्रवेशासाठी आवश्यक पात्रता व प्रशिक्षण प्रक्रिया, प्रशिक्षणानंतर उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधी,
महासागरावर मोठ्या जहाजांवरील राहणीमान आणि
मर्चंट नेव्हीमुळे जगभर प्रवास करण्याची संधी कशा उपलब्ध असतात ह्या गोष्टींचे मार्गदर्शन होणार आहे.
या मार्गदर्शनासाठी कॅप्टन मकरंद सरदेसाई (फॅकल्टी – बी. एस्सी. नॉटिकल सायन्स), श्री. अश्विन देशमुख (कॉम्प्युटर सायन्स), श्री. प्रमोद म्हात्रे (प्लेसमेंट ऑफिसर) आणि कु. नियती पाटील उपस्थित राहणार आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शिबिराचे आयोजन वराडकर हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, कट्टा येथे गुरुवार, १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे.
हे मार्गदर्शन व प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे. सर्व दहावी, अकरावी व बारावीतील विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे गव्हर्नर कौन्सिल सदस्य श्री. विजय केनवडेकर यांनी केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये 'मार्केट डे' उत्साहात.
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये 'मार्केट ...
पळसंब येथे भव्य रानभाजी महोत्सवाचे आयोजन.
पळसंब येथे भव्य रानभाजी महोत्सवाचे आयोजन.शेत...
भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न.