ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
कलाउत्सव स्पर्धेत भगवती हायस्कूल मुणगेचे यश.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

कलाउत्सव स्पर्धेत भगवती हायस्कूल मुणगेचे यश.

कलाउत्सव स्पर्धेत भगवती हायस्कूल मुणगेचे यश.


मसुरे | प्रतिनिधी : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्ष‌ण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कलाउत्सव २०२५ या स्पर्धेत, श्री भगवती हायस्कूल मुणगे  प्रशालेतील विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. न्यु इंग्लिश स्कूल, कसाल येथे झालेल्या स्पर्धेत विविध कला प्रकारांमध्ये प्रशालेतील विद्यार्थी सहभागी झाल होते. 

Article image


या कलाउत्सव स्पर्धेत दृश्यकला समुह - स्वदेशी खेळणी तयार करणे या कलाप्रकारात इयत्ता दहावीतील वि‌द्यार्थीनी कु. मृगाक्षी मंगेश हिर्लेकर व कु. सुहानी सत्यवान लब्दे या विद्यार्थीनींनी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला. 


स्वदेशी खेळण्यांमध्ये सुबक अशा कळसूत्री बाहुल्या या वि‌द्यार्थीनीनी बनवल्या होत्या. 

या विद्यार्थ्यांना कला शिक्षिका गौरी तवटे यांचे मार्गदर्शन लाभले. 


सहभागी व यशस्वी वि‌द्याथ्याचे शाळा व श्री भगवती एज्यु. सोसायटी मुणगेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स