ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
मालवण मधील भैरवी देवालयातील भजन महोत्सवाच्या वेळापत्रकाची रूपरेषा जाहीर.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवण मधील भैरवी देवालयातील भजन महोत्सवाच्या वेळापत्रकाची रूपरेषा जाहीर.

मालवण मधील भैरवी देवालयातील भजन महोत्सवाची रूपरेषा व वेळापत्रक जाहीर.

Article image


उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते २२ सप्टेंबर रोजी उद्घाटन. 


अनेक दिग्गज आणि मान्यवरांची असणार उपस्थिती.




मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील बाजारपेठेतील संतसेना महाराज मार्गावरील भैरवी देवालयातील भजन महोत्सवाची रूपरेषा जाहीर झाली आहे. याचा शुभारंभ नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी २२ सप्टेंबरला रात्री ८ वाजता होणार आहे. सलग अकरा दिवस जिल्ह्यातील नामवंत डबलबारी भजनांच्या बुवांकडून भजन सेवा करण्यात येणार आहे. दसऱ्याला २ ऑक्टोबरला सोहळ्याचा समारोप होणार आहे, अशी माहिती भैरवी बाळगोपाळ मित्रमंडळाचे अध्यक्ष अंकुश चव्हाण व नाभिक समाजाचे नेते विजय शिवा चव्हाण यांनी दिली. यंदा उत्सवाचे १३ वे वर्ष आहे.


या महोत्सवाचे उद्घाटन उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाभिक समाजाचे नेते विजय चव्हाण हे भूषविणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, उद्योजक अनिल मालवणकर, विजय केनवडेकर, प्रदीप मुंबरकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर, नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, नाभिक समाजाचे तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.


या उत्सवाचे पहिले पुष्प २२ सप्टेंबर रोजी आई तुळजाभवानी ढोलकी भजन मंडळाचे बुवा राजा लुडबे गुंफणार आहेत. २३ सप्टेंबर रोजी देवकीमाता मंडळ (बुवा-सिद्धेश पाताडे), २४ सप्टेंबर रोजी भद्रकाली मंडळ (बुवा-सिद्धेश कांबळी), २५ सप्टेंबर रोजी ब्राह्मण देव भजन मंडळ (बुवा-शामसुंदर आचरेकर), २६ सप्टेंबर रोजी बाल दांडेश्वर भजन मंडळ (बुवा - उत्कर्ष आचरेकर), २७ सप्टेंबर रोजी आकारी ब्राह्मण मंडळ (बुवा-चेतन धुरी), २८ सप्टेंबर रोजी ब्राह्मण देव भजन मंडळ (बुवा-पप्पू सामंत), २९ सप्टेंबर रोजी ब्राह्मणदेव मंडळ, कातवड (बुवा-मंगेश नलावडे), ३० सप्टेंबर रोजी ब्राह्मणदेव प्रसादिक भजन मंडळ (बुवा-देवेश धुरी), १ ऑक्टोबर रोजी घुमडाई सातेरी भजन मंडळ (बुवा- नाना सामंत), २ ऑक्टोबर रोजी अष्टपैलू कलानिकेतन भजन मंडळ (बुवा - सुनील परुळेकर). 


या उत्सवात इतरही सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम भैरवी मंदिरात होणार आहेत. भाविक आणि भजन रसिकांनी या भजन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स