मालवण तालुका भंडारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
मालवण तालुका भंडारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुका भंडारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, १४ सप्टेंबर रोजी भरड येथील हॉटेल लीलांजली येथे संस्थेचे चेअरमन रविंद्र तळाशिलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर केला. याबाबत सर्व सभासदांनी समाधान व्यक्त केले असल्याची माहिती मिळत आहे.
यावेळी सभेत संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण मयेकर यांनी कामकाजाची माहिती दिली व वार्षिक अहवालाचे वाचन केले.
यावेळी सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला.
सभेमध्ये संस्थेचे हितचिंतक सभासद सचिन गवंडे, अरविंद सराफ आणि नंदन देसाई यांनी संस्थेच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. त्यांनी, थकीत कर्जदारांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची सूचना केली.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष यशवंत मिठबावकर, संचालक सुनिल नाईक, सचिन आरोलकर, श्रीकांत वेंगुर्लेकर, सुरेश चव्हाण, जयप्रकाश परुळेकर, सागर हडकर, अजित गवंडे, रसिका तळाशिलकर, श्रद्धा नाईक, देवदत्त हडकर, हेमंत आचरेकर, चंद्रशेखर वाईरकर, गोविंद सोनसुरकर, प्रसाद वराडकर, बाळकृष्ण गावकर, सुधीर कद्रेकर, सतीश धुरी, वृषाली कांबळी, चंद्रकांत रेवंडकर, सुनीता दुर्गुळे यांच्यासह अन्य सभासद उपस्थित होते.
संस्थेचे कर्मचारी चेतन हडकर, मिताली कांबळी, विनोद बिलये आणि अल्पबचत प्रतिनिधी कविता मयेकर, शुभदा मोरे, गौरव बिलये यांनी सभेच्या यशस्वी आयोजनासाठी मदत केली. सभेत १० टक्के लाभांश जाहीर केल्याबद्दल चेअरमन, संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाचे अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे जेष्ठ संचालक सुनिल नाईक यांनी आभार मानले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...