गोळवण,कुमामे, डिकवल येथे केली कृषक ओळखपत्र नोंदणी.
गोळवण,कुमामे, डिकवल येथे केली कृषक ओळखपत्र नोंदणी.
पोईप | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील गोळवण, कुमामे, डिकवल येथील शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी शासनाच्या ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत जिल्हा महसूल प्रशासनाच्या वतीने ऐश्वर्या काळुशे (उपविभागीय अधिकारी कुडा व वर्षा झालटे (तहसीलदार मालवण) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सुभाष लाड (सरपंच, ग्रामपंचायत गोळवण), उपसरपंच शरद मांजरेकर यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने मंडळ अधिकारी पेंडूर व ग्राम महसूल अधिकारी, ग्राम महसूल सेवक , कृषी सहाय्यक, पोलिस पाटील तसेच महा ई सेवा केंद्र वराड श्री राजन वराडकर प्रविण मिठबावकर यांनी गोळवण,कुमामे , डिकवल येथील शेतकऱ्यांची कृषक ओळखपत्र तथा फार्मर आयडी नोंदणी केली अशी माहिती मिळत आहे.
या वेळी उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे , तहसीलदार वर्षा झालटे यांनी सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन शासनाच्या ॲग्रीस्टॅक योजनेचे महत्व आणि गरज पटवून दिले व सर्वांनी या योजनेंतर्गत आपली फार्मर्स आयडी नोंदणी करावी असे आवाहन केले.शेवटी सरपंच सुभाष लाड यांनी उपस्थित अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी व शेतकरी ग्रामस्थ यांचे आभार मानले.
कृषक ओळखपत्र (Farmer ID) हे शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल ओळखपत्र आहे, ज्याद्वारे त्यांना शेतीविषयक विविध सरकारी योजनांचा लाभ थेट मिळतो. हे ओळखपत्र मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्री स्टॅक महाराष्ट्र नोंदणी पोर्टल किंवा शेती कल्याण पोर्टल वर जाऊन नोंदणी करावी लागते, जिथे आधार पडताळणी करून ही प्रक्रिया पूर्ण करता येते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)