तालुकास्तरीय खो - खो क्रीडा स्पर्धेत रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय विजयी.
तालुकास्तरीय खो - खो क्रीडा स्पर्धेत रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय विजयी.
मालवण : क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलांच्या तालुकास्तरीय खो - खो क्रीडा प्रकारात स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलांचा संघ विजयी ठरला. अंतिम फेरीत त्यानी वराडकर हायस्कूल, कट्टा संघाचा पराभव केला. रेकोबा हायस्कूल येथे १२ सप्टेंबरला ही स्पर्धा संपन्न झाली.
या विजयी संघात चिन्मय मेस्त, सिद्धेश करंगुटकर, देवेश गावकर, यश कोळंबकर, शुभम लुडबे, हरिश्चंद्र देऊलकर, मयुर बागवे, सूरज आळवे, तुषार आढाव, ओम मिठबावकर, सुयश कदम, जतीन करंगुटकर, राज लाड यांचा समावेश होतो.
यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव श्री. चंद्रशेखर कुशे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संघाला सागर सावंत यांचे क्रीडा मार्गदर्शन लाभले अशी माहिती मिळत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
४१ व्या युथ स्टेट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने मुले आणि मुलींच्या संघांचा सहभाग.
४१ व्या युथ स्टेट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्...