ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
रापण नौका व जाळ्यांचे नुकसान.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

रापण नौका व जाळ्यांचे नुकसान.

रापण नौका व जाळ्यांचे नुकसान.


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण चिवला किनाऱ्यावरील बंधाऱ्याच्या उतारावर उभी करून ठेवलेली रामचंद्र मणचेकर रापण संघाची नौका समुद्राच्या मोठ्या भरतीतील लाटांच्या तडाख्याने समुद्रात ओढली जाऊन नुकसानग्रस्त झाली. १० सप्टेंबरला घडलेल्या या घटनेनंतर, स्थानिक मच्छिमारांनी धाव घेत सुमारे दोन तासाच्या प्रयत्नांनंतर नौका बंधाऱ्यावर आणली. या दुर्घटनेत नौका फुटल्याने तसेच जाळी फाटली गेल्याने सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती मिळत आहे. 

Article image



या दुर्घटनेत या रापण नौका फुटल्याने तसेच जाळी तुटल्याने व इतर मच्छिमारी साहित्याचे नुकसान असे मिळून सुमारे ७ ते ८ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज मच्छिमारांनी वर्तविला अशी माहिती मिळत आहे. मच्छिमार हंगाम सुरु झाला असताना झालेले हे नुकसान खूप मोठे आहे. या घटनेनंतर मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत माहिती घेतली, असे सूत्रांकडून समजते.


सौजन्य | मालवण ब्यूरो

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स