पालकमंत्री नितेश राणे यांचा वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे जनता दरबार.
पालकमंत्री नितेश राणे यांचा वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे जनता दरबार.
भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू परब यांचे उपस्थितीचे आवाहन.
वेंगुर्ले | ब्यूरो न्यूज : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वेंगुर्ले तहसील कार्यालय येथे जनता दरबार आयोजित केला आहे. तरी ज्या ज्या नागरिकांना शासन स्तरावर काही समस्या, अडचणी असतील त्यांनी या जनता दरबारात उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना शासन पातळीवर कोणत्याही अडचणी समस्या असतील तर त्या वेळीच सुटून त्यातून मार्ग निघावा. यासाठी पालकमंत्री नितेश राणे जनता दरबाराद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. यापूर्वी झालेल्या सर्व जनता दरबाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. मंत्री नितेश राणे यांनी समोर आलेल्या अडचणी, समस्या त्या त्या विभागामार्फत सोडविल्या. तर काही समस्या जनता दरबारातच सुटल्या. वेंगुर्ले तालुक्यातील नागरिकांना अशा स्वरूपात काही समस्या किंवा अडचणी असल्या तर त्यांनी उद्या होणाऱ्या जनता दरबारामध्ये सहभागी होऊन आपले प्रश्न लेखी स्वरूपात उपस्थित करावे असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब यांनी केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात.
कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्सा...
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.