निशांत शिरोडकरचे जिल्हास्तरावर दुहेरी यश.
निशांत शिरोडकरचे जिल्हास्तरावर दुहेरी यश.
मालवण : क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित स्पर्धेत, ९ सप्टेंबरला उपरकर शूटिंग रेंज, वेंगुर्ले येथे संपन्न झालेल्या १९ वर्षाखालील ( मुले) रायफल शूटिंग मधील पिप साईट या क्रीडा प्रकारात स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा १२ वी कला शाखेतील कु. निशांत नितीन शिरोडकर याने जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. तसेच दिनांक १९ ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे संपन्न झालेल्या वेटलिफ्टिंग ७९ किलो वजनी गटात देखील त्याने प्रथम क्रमांक पटकावला असून दोन्ही क्रीडा प्रकारात त्याची विभाग स्तरासाठी त्याची निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे व संबंधित मान्यवरांनी कु. शिरोडकर याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याला क्रीडा मार्गदर्शक प्रा. हसन ख़ान यांचे मार्गदर्शन लाभले अशी माहिती मिळत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
वायरी बांध येथे सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक अजय शिंदे व नूतन नगरसेविका मेघा सावंत गांवकर यांचा सत्कार.
वायरी बांध येथे सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक अज...
मालवण तालुकास्तरीय शालेय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवचा शुभारंभ.
मालवण तालुकास्तरीय शालेय बाल, कला, क्रीडा व ज्...
विनर्स स्पोर्टस् ॲकॅडमी येथे क्रिकेटच्या दिवाळी प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ.
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.