सेवा पंधरवडानिमित्त भाजपच्या वतीने जिल्हास्तरीय कार्यशाळा.
सेवा पंधरवडानिमित्त भाजपच्या वतीने जिल्हास्तरीय कार्यशाळा.
सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत 'सेवा पंधरवडा' अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून, भाजप सिंधुदुर्ग जिल्ह्याने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
गुरुवार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता ओरस, सिंधुदुर्गनगरी येथील भाजप जिल्हा कार्यालय (वसंतस्मृती) येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेत सेवा पंधरवड्याअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे नियोजन केले जाईल. यामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, दिव्यांग व्यक्तींचा सन्मान, क्रीडा स्पर्धा आणि दिव्यांगांना आवश्यक उपकरणांचे वाटप यांसारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे.
यावेळी बूथ स्तरावर हे कार्यक्रम प्रभावीपणे कसे राबवता येतील, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. तसेच, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून समाजोपयोगी कार्य करण्याचे नियोजन या कार्यशाळेत होणार आहे. या अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी भाजपचे सर्व पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, महामंत्री आणि मोर्चा आघाडी जिल्हाध्यक्षांना या कार्यशाळेत वेळेवर आणि पूर्णवेळ उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.