पोईप येथे वेलांकणी चॅपेलमध्ये वेलांकणी मातेचा उत्सव उत्साहात.
पोईप येथे वेलांकणी चॅपेलमध्ये वेलांकणी मातेचा उत्सव उत्साहात.
पोईप | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील पोईप येथे वेलांकणी चॅपेलमध्ये वेलांकणी मातेचा उत्सव ८ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पोईप येथील ख्रिस्ती बांधवांनी ९ दिवस नोव्हेना व मिसा अर्पण केले. यात सर्व समाजासाठी व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना केली.
या सणासाठी प्रमुख मसुरे पॅरिसचे फादर गिल्बर्ट, चिंदर गावचे फादर सॅबी, कट्टा पॅरिसचे फादर थॉमस आणि ओरोस पॅरिसचे फादर डाॅन बाॅस्को स्कूलचे मुख्याध्यापक मेलविन उपस्थित होते. यावेळी फादर मेलविन यांनी मिसा अर्पण केले. व उपस्थिताना धार्मिक विषयांवर मार्गदर्शन केले. धर्मोपदेशक (फादर)यांनी वेलांकणी मातेची मूर्ती घेऊन सर्व ख्रिस्ती बांधवांच्या उपस्थितित पोईप बाजारपेठेत शांतता फेरी संपन्न झाली.
या सणासाठी मसुरे, कसाल, चिंदर व फणसवाडी या गावातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेलांकणी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष निकोलस लोबो यांनी सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन केले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)