ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भाजप कडून सेवा पंधरवड्याचे आयोजन.

भाजप कडून सेवा पंधरवड्याचे आयोजन.

प्रकाशन: 08 Sep 2025 07:11 PM
वाचन संख्या 324

भाजप कडून सेवा पंधरवड्याचे आयोजन.



ओरोस | ब्यूरो न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावड्याचे आयोजन देशभरात करण्यात येत आहे. भाजप सिंधुदुर्गकडून सेवा पंधरावड्याचे आयोजन १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावड्याचे आयोजन देशभरात करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी 'सेवा परमो धर्म',' या पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या विचारांना पुढे नेत काही सेवाभावी उपक्रम साजरे करत आहेत.

Article image


स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, दिव्यांगाचा सन्मान, विकसित भारत चित्रकला स्पर्धा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर प्रदर्शनी, प्रबुद्ध संमेलन, दिन दयाळ जयंती २५ सप्टेंबर आणि महात्मा गांधी जयंती - २ ऑक्टोबर अशा पद्धतीने सेवाभावी अशा सामाजिक उपक्रमांद्वारे खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनात साजरा करण्यात येणार आहे.


भाजपा किसान मोर्चा कडून 'एक पेड मा के नाम' हे विशेष अभियान राबवण्यात येईल. 


यानिमित्त भाजपा पदाधिकाऱ्यांसाठी गुरूवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वा जिल्हा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व च्या सर्व १४ मंडळांमध्ये सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात येणार आहे.


पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात विश्वगुरू निर्माण होणारा सेवाभावी आत्मनिर्भर भारत आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याच स्वदेशी मूल्यांवर ठाम राहिलेला भारत आज अमेरिकेलाही टक्कर देऊ पाहतोय. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वरील सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांच्या नेतृत्वात सर्व सेवाभावी कार्यक्रम होतील. सह संयोजक म्हणून विजय केनवडेकर, प्राची इस्वलकर, आणि सोशल मीडिया प्रतिनिधी म्हणून श्रीकृष्ण परब यांची निवड करण्यात आली आहे. या अभियान दरम्यान जिल्ह्याचे सुपुत्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा दिनांक २० सप्टेंबर रोजी येणारा वाढदिवस सुद्धा विविध सेवा उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

लोकप्रिय टॅग्स