शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे कणकवली तालुका नवरात्रोत्सव समिती जाहीर.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे कणकवली तालुका नवरात्रोत्सव समिती जाहीर.
कणकवली | ब्यूरो न्यूज : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे कणकवली तालुका आयोजित नवरात्रोत्सव दिनांक २२ सप्टेंबर २०२५ ते दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर विजय भवन, कणकवली येथे माजी आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संदेश पारकर, माजी आमदार परशुराम उपरकर,माजी आमदार राजन तेली, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत,युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीत, उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विलास गुडेकर तर खजिनदार पदी महेश कोदे यांची निवड करण्यात आली.
या बैठकीला माजी उपजिल्हाप्रमुख व जेष्ठ शिवसैनिक राजू शेट्ये, उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, उपतालुकाप्रमुख राजू राणे, धीरज मेस्त्री, सिद्धेश राणे, अवि सावंत, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, संजय रावले, अरुण परब व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक उपस्थित होते अशी माहिती मिळत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)