पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत प्रार्थना व दीपोत्सव.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत प्रार्थना व दीपोत्सव.
कणकवली | ब्यूरो न्यूज : परमहंस बाबा भालचंद्र महाराज संस्थान, कणकवली येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त, २३ जून २०२६ रोजी सायंकाळी कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते आणि माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्र मंडळांच्या वतीने विशेष प्रार्थना व दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बाबांच्या समाधीस्थळी दीपप्रज्वलन करून मंत्री नितेश राणे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे तसेच त्यांच्या हातून राज्याच्या विकासासाठी अधिकाधिक जनहिताची कामे घडावीत अशी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी माऊली मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते तथा कणकवलीतील ज्येष्ठ व्यापारी राजेंद्र पेडणेकर यांनी, पालकमंत्री नितेश राणे यांना भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना कार्य करण्याची संधी मिळावी अशी सदिच्छा व्यक्त केली.
या कार्यक्रमाला परमहंस बाबा भालचंद्र महाराज संस्थानचे व्यवस्थापक विजय केळुस्कर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर,सामाजिक कार्यकर्ते सुनील काणेकर, गजानन उपरकर, मधुकर पाटील, पुरोहित मुळीये (काका) ,श्रीरंग पारगावकर, सचिन कुवळेकर, शिवप्रसाद घाडीगावकर, महेश वांगणकर, प्रसाद पाताडे, करण सावंत, सायली सावंत, नितीन खोत असे विविध मान्यवर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)