ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मसदे येथील स्वामी समर्थ मठात ११ ऑगस्टला विविध कार्यक्रम.

मसदे येथील स्वामी समर्थ मठात ११ ऑगस्टला विविध कार्यक्रम.

प्रकाशन: 30 Jul 2025 06:50 PM
वाचन संख्या 222

मसुरे | प्रतिनिधी : प. पू. गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री स्वामी समर्थ मठ, मसदे-वडाचापाट येथे सोमवार, ११ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८:०० वाजता सामूहिक सत्यनारायण महापूजा, ११:०० वाजता महाआरती, दुपारी १२:०० वाजता गावडे काका महाराज यांचे आगमन आणि आध्यात्मिक मार्गदर्शन, १:०० वाजता महाप्रसाद-अन्नदान, २:३० वाजता श्री देव वेताळ मुंजेश्वर प्रासादिक भजन मंडळ, पोईप बुवा ओंकार येरम यांचे भजन, सायंकाळी ५:०० वाजता भजने, ७:०० वाजता दैनंदिन आरती आदी कार्यक्रम होणार आहेत. 


Article image


यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन सेवेकऱ्यांतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९४२३५३८४१८ या नंबरवर संपर्क साधावा.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स