ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
११ हजार पदांसाठी पोलीस भरती होणार..!

११ हजार पदांसाठी पोलीस भरती होणार..!

प्रकाशन: 18 Jul 2025 05:40 PM
वाचन संख्या 120

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती.

मुंबई | ब्यूरो न्यूज : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११,००० पदांसाठी पोलीस भरती होणार असल्याची माहिती दिली आहे. विधान भवनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी पोलीस भरतीविषयी मोठी घोषणा केली आहे.

मागील ३ वर्षात ३८ हजार ८०२ जागांसाठी पोलीस भरती झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात सांगितले.

पोलीस दलात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्रात ११ हजार जागांसाठी पोलीस भरती केली जाणार आहे. पोलीस भरतीच्या मान्यतेकरीता गृह विभागाला प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये भरतीला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

पोलीस भरती प्रक्रियेत सुरुवातीला मैदानी चाचणी आणि त्यानंतर मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाईल. या भरतीमध्ये बँड समन, चालक शिपाई, पोलिस शिपाई तसेच राज्य राखीव पोलिस दलातील अंमलदार पदांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. उमेदवारांना एका पदासाठी फक्त एकाच जिल्ह्यात अर्ज करता येणार आहे. थोडक्यात तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात, त्याच जिल्ह्यातून अर्ज भरता येईल.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. या प्रस्तावावर ३० सदस्यांनी मत व्यक्त केले आहे. यावर विविध प्रकारच्या सूचना देण्यात आल्या. काहींनी प्रस्तावावर टीका देखील केली. मी बिझनेस ॲडव्हायझरीच्या कमिटीत बसलो होतो. अलीकडच्या काळात प्रस्तावात एवढे विभाग समाविष्ट केले जातात, की न्याय मिळत नाही, विरोधी पक्षातील काही सदस्यांनी सांगितले. तेव्हा दोन किंवा चार विभाग असावेत अशी चर्चा झाली होती. पण दुर्दैवाने विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावात मात्र एकही खातं सोडलं नाही. विरोधी पक्षात काम करण्याची सवय असल्यामुळे किती खात्यांवर चर्चा उपस्थित करायला हवी याचे नियोजन करायला हवे. अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यासाठी मी उभा आहे तेव्हा मी आणि आपल्या सगळ्यांत वेदना आहेत, देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स