ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट.

प्रकाशन: 23 Jul 2025 04:23 PM
वाचन संख्या 609

रेल्वेमंत्र्यांकडे गणपती स्पेशल गाड्यांची मागणी. 


नवी दिल्ली | ब्यूरो न्यूज : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची बुधवार, २३ जुलै रोजी दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान आगामी गणेशोत्सव २०२५ च्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी, तसेच रेल्वे व्यवस्थेवर येणारा ताण लक्षात घेता, कोकणवासीयांसाठी विशेष गणपती रेल्वेगाड्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी खासदार नारायण राणे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली.


Article image


यावेळी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि गोवा या ठिकाणांहून कोकणात येणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या, ऑनलाइन आरक्षण गर्दीमुळे सर्वसामान्यांना तिकीट मिळण्यात होणाऱ्या अडचणी, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला आणि सावंतवाडी परिसरातील गावी जाण्यासाठी थेट विशेष गाड्यांची आवश्यकता हे मुद्दे भेटीदरम्यान मांडण्यात आले. 


खासदार राणे यांच्या या बैठकीनंतर रेल्वे मंत्रालय सकारात्मक पाऊल उचलेल, अशी अपेक्षा कोकणवासीय व्यक्त करत आहेत. कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी गणपतीच्या काळात तिकीट मिळवणे हे एक मोठं संकट ठरतं, यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठीही राणे साहेब प्रयत्नशील आहेत. गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी केवळ सण नाही, तर भावनांची पुनर्भेट आहे आणि ती वेळेवर होण्यासाठी रस्ते आणि रेल्वे या दोन्ही माध्यमांची गरज आहे. खासदार नारायण राणे यांचा हा पुढाकार एका लोकप्रतिनिधीने वेळेवर उचललेलं पाऊल महत्वाचं असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स