ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आचऱ्यातील तरुणांना भाजपच्यावतीने श्रद्धांजली.

भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आचऱ्यातील तरुणांना भाजपच्यावतीने श्रद्धांजली.

प्रकाशन: 21 Jun 2025 05:34 PM
वाचन संख्या 106

मालवण | ब्यूरो न्यूज : देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथील रिक्षा आणि एसटी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातत आचरा येथील मृत्यूमुखी पडलेल्या संकेत सदानंद घाडी (वय ३५, आचरा वरचीवाडी), संतोष रामजी गावकर (वय ३५, आचरा गाऊडवाडी), रोहन मोहन नाईक (वय ३५, आचरा गाऊडवाडी) आणि सोनू कोळंबकर (वय ४५, आचरा पिरावाडी) यांना मालवण तालुका भाजपच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, विलास हडकर, शहर मंडळ अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, महेश मांजरेकर, आप्पा लुडबे, विजय निकम, संतोष गावकर, दीपक सुर्वे, ललित चव्हाण, अभी गावडे, घागरे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. तो वाढदिवस भाजपा कार्यालयात साजरा होणार होता. मात्र आपल्या तालुक्यातील तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान या घटनेमुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय धोंडी चिंदरकर यांनी घेतला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स