ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन.

जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन.

प्रकाशन: 13 Jun 2025 12:32 PM
वाचन संख्या 49

व्यापारी महासंघ व पर्यटन व्यावसायिक दरम्यान सकारात्मक चर्चा.

मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सागरी किनारपट्टीवरील पावसाळी पर्यटनाकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने पर्यटन व्यवसायिकांच्या साथीने पावसाळी पर्यटनाला प्रोत्साहन देत विविध उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. येथील पर्यटन बारमाही सुरु राहण्याच्यादृष्टीने पावसाळी पर्यटन ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने महासंघाने पुढाकार घेतला असल्याचे व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी सांगितले.

दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार महासंघ तयार करीत असलेल्या सिंधुदुर्गाच्या व्यापार धोरणात समाविष्ट करावयाच्या पर्यटन व्यवसाय विषयक बाबींवरही महासंघ व पर्यटन व्यावसायिक यांच्यात सकारात्मक चर्चा झाली, नितीन वाळके यांनी सांगितले.

मालवण येथील हॉटेल चैतन्य मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत नितीन वाळके बोलत होते. यावेळी मालवण व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, मालवण तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रमोद ओरसकर, बाळू अंधारी, गणेश प्रभुलकर, हर्षल बांदेकर आदी उपस्थित होते.

यंदाच्या पर्यटन हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात मे महिन्यात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय व या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या घटकांचेही मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. पर्यटन व्यावसायिकांसाठी मे महिना हा पुढील पावसाळ्याच्या काळासाठी बेगमीचा काळ असतो. पावसाळ्याचे तीन महिने पर्यटन बंद असते. याचा विचार करता पावसाळा कालावधीत निसर्गाने मुक्त उधळण केलेली अनेक ठिकाणे पर्यटकांनी गजबजून जावीत या दृष्टीने प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.

यावेळी नितीन वाळके म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पर्यटन व्यवसायिक, मच्छिमार, आंबा व्यावसायिक, व्यापारी यांसह इतर व्यवसायिकांवर आर्थिक संकट कोसळले. या नुकसानीचे परिणाम गणेश चतुर्थी काळात निश्चित पहायला मिळतील. कारण मे महिना हा या व्यवसायांसाठी बेगमीचा काळ असतो. हंगामातील ५० टक्के उलाढाल १५ एप्रिल ते १५ जून या दोन महिन्याच्या काळात होते. पर्यटनाच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा काळ आहे. मात्र मे महिन्यात पाऊस पडल्याने येथील समुद्री पर्यटन, किल्ला होडी सेवा व इतर पर्यटन व्यवसाय ठप्प झाले. वर्षातील पावसाचे तीन महिने पर्यटन बंद असताना अशा नैसर्गिक आपत्तीमुळेही पर्यटन व्यवसायाचे नुकसान होत आहे. त्यामुळे आता पावसाळी पर्यटन विकसित होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा व्यापारी संघाने जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिकांची बैठक घेऊन पावसाळी पर्यटनासाठी काय काय करता येईल, कोणते उपक्रम घेता येतील यावर चर्चा करून तातडीच्या उपाययोजना व दीर्घकालीन उपाययोजना ठरविण्यात आल्या. याची अंमलबजावणी लवकरच सुरु करण्यात येणार आहे, नितीन वाळके म्हणाले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स