पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मंजुरी पत्र.
शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना.
सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दुर्दैवी घटनेत बळीराजाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला नियमानुसार मदत दिली जाते. या सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शिवडाव येथील कृष्णा करंगुटकर या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याने, शेर्पे येथील तुषार शेलार यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याने तसेच करंजे येथील मंगेश बोभाटे यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसास मंजुरी पत्र देण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)