ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिर जत्रोत्सव १९ जुलै रोजी!

बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिर जत्रोत्सव १९ जुलै रोजी!

प्रकाशन: 12 Jun 2025 09:55 PM
वाचन संख्या 154

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील मसुरे गावची मूळमाया अशी ओळख असलेल्या बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिरचा आषाढ महिन्यातील देवीचा वार्षिक जत्रोत्सव १९ जुलै २०२५ रोजी संपन्न होत आहे. पावसाळ्यात होणारा हा एकमेव जत्रोत्सव असल्याने मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी, देवीचे राज्याबाहेरील भक्त सुद्धा या जत्रोत्सवास उपस्थिती दर्शवतात. ाला पावणारी व हाकेला धावणारी अशी देवीची ख्याती असल्याने भाविकांचा जनसागर यादिवशी बिळवस येथे दिसून येतो.

जत्रोत्सवाच्या दिवशी म्हणजे १९ जुलै रोजी सकाळी विधीवत पूजन झाल्यानंतर भाविकांच्या ओट्या भरण्यास प्रारंभ होणार असून उत्सवाची सांगता त्याच दिवशी सायंकाळी होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेणे, तसेच ओटी भरणे, फेडणे आदी कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री सातेरी देवालय ट्रस्ट व समस्त बिळवस ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 22
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 329

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स