चिंदर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
आचरा | ब्यूरो न्यूज : श्री देवी सरस्वती व ग्रंथसंग्रहालय चिंदरच्यावतीने चिंदर गावातील दहावी, बारावीत विशेष प्राविण्य मिळवत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ श्री देवी सरस्वती चिंदर गावठणवाडी येथे पार पडला. यामध्ये कोमल अपराज, कुंदन नाटेकर, दिनेश माळगांवकर, अनुष्का हडकर, मयुरेश साटम, वैष्णवी परब, गौरव लब्दे यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी कार्यकारिणी सदस्य महेंद्र मांजरेकर, रावजी तावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
चिंदर ग्रामपंचायत मधून बदली झालेले प्रभारी ग्रामपंचायत अधिकारी मंगेश साळसकर यांचाही च्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, संविधानाच्या पुस्तकाची प्रत देवून अध्यक्ष प्रकाश मेस्त्री व कार्यकारिणीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
चिंदर ग्रामपंचायत कडून प्रतिवर्षी श्री देवी सरस्वती व ग्रंथसंग्रहालयला पुस्तके भेट दिली जातात. यावर्षीही सुमारे वीस हजार रुपये किंमतीची पुस्तके देण्यात आली असून या पुस्तकांचे वितरण सरपंच नम्रता महंकाळ-पालकर यांच्या हस्ते अध्यक्ष प्रकाश मेस्त्री यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी ग्रंथपाल नम्रता महंकाळ-पालकर, प्रकाश खोत, विवेक परब, गोपाळ चिंदरकर, संतोष अपराज, भूषण दत्तदास, प्रफुल्ल माळगांवकर, अनिल लब्दे, रणजित दत्तदास, रोहित पाटील, तुषार पवार, वाचक, सभासद आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रावजी तावडे यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार सहसचिव सिध्देश गोलतकर यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)