ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली 'मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघा'ची महत्त्वपूर्ण बैठक.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली 'मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघा'ची महत्त्वपूर्ण बैठक.

प्रकाशन: 11 Jun 2025 12:24 PM
वाचन संख्या 29

तळेरे | ब्यूरो न्यूज : मनोरंजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या मराठी नाट्यसृष्टी पुढील समस्या दूर करणे, व्यवहार्य मागण्यांची पूर्तता करणे हे शासन म्हणून आमचे कर्तव्य आहे. हे लक्षात ठेवून आपल्या मागण्यांवर त्वरित कार्यवाही करीत आहोत, अशी खात्री राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी ‘मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघा’च्या पदाधिकाऱ्यांना दिली.

‘मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ’ ही मराठी व्यावसायिक नाट्य निर्मात्यांची नोंदणीकृत (स्थापना १९६९) संस्था आहे. या संस्थेच्या मागण्यांवर चर्चा – निर्ण सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सोमवार, ९ जून रोजी पु.ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी येथील समिती कक्षामध्ये विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला ‘मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ’चे उपाध्यक्ष ज्ञानेश महाराव, प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे व सहकार्यवाह श्रीकांत तटकरे ; तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक श्रीराम पांडे, ‘पु.ल. देशपांडे कला अकादमी’ संचालक मीनल जोगळेकर आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत नाट्य निर्माता संघ पदाधिकाऱ्यांनी सर्व नाट्य निर्मात्यांच्या नाटकाचे नेपथ्य (सेट) व अन्य सामान एकाच जागी ठेवण्यास गोडाऊनसाठी जागा मिळावी, नाटकाच्या सामानाची व रंगकर्मीची वाहतूक करणाऱ्या बस व टेम्पोच्या पार्किंगसाठी गोडाऊन जवळच जागा मिळावी, नवीन नाटक निर्मितीसाठी मिळणाऱ्या अनुदानात भरघोस वाढ व नियमावलीत बदल व्हावा, नाट्य निर्मात्यांना निवासासाठी सवलतीच्या दरात सिडकोच्या सदनिका उपलब्ध करून द्याव्यात ह्या प्रमुख मागण्या नाट्य निर्माता संघातर्फे बैठकीत सादर करण्यात आल्या.

या मागण्यांमागील अडचणी मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव विकास खारगे व सहसंचालक पांडे यांनी समजून घेतल्या. त्यावर सविस्तर चर्चा झाल्यावर “मागण्या रास्त असल्याने त्या लवकरात लवकर सोडवण् कार्यवाही व्हावी”, अशा सूचना उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना मंत्री आशिष शेलार यांनी दिल्या. “मराठी नाट्य व्यवसाय सशक्त राहावा, शासनाच्या मदतीची निर्मात्यांना गरज राहू नये, त् आवश्यक ते सहकार्य करावे, आमचे शासन प्रयत्नशील आहे,” असेही ते म्हणाले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 448

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स