शिवसेना मालवण शहरप्रमुख पदी दीपक पाटकर नियुक्त.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण नगरपालिकेचे माजी नगरसेवक दीपक गणपत पाटकर यांची शिवसेनेच्या मालवण शहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.
मालवण नगरपालिकेचे माजी नगरसेवक असलेले दीपक पाटकर हे शहरातील प्रभावशाली लोकसंपर्कासाठी परिचित आहेत.
आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली ते शिवसेनेत कार्यरत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत शिवसेनेच्या मालवण शहरप्रमुख पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर स्व. आनंद दिघे यांचे विचार शहरातील प्रत्येक घराघरात नेऊन शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संपर्कमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे यांना अभिप्रेत असलेली शिवसेना वाढवण्यासाठी सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आपण निश्चितपणे प्रयत्न करू, ग्वाही दीपक पाटकर यांनी दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)