ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवणमध्ये पर्यटन व्यावसायिकांची १० जून रोजी खुली सभा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणमध्ये पर्यटन व्यावसायिकांची १० जून रोजी खुली सभा.

प्रकाशन: 07 Jun 2025 05:15 PM
वाचन संख्या 28

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व संघटनांचे पदाधिकारी व पर्यटन व्यावसायिकांची खुली सभा मंगळवार, १० जून २०२५ रोजी सायंकाळी ३:५९ ते ६:०० या वेळेत मालवण, धुरीवाडा येथील संस्कार सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न होणार आहे. या सभेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन वाढीसाठी आवश्यक उपाययोजनांची रुपरेषा आखून अंमलबजावणीसाठी कालबद्ध कृती कार्यक्रम ठरवणे व त्यानुसार जबाबदाऱ्यांचे वाटप करणे तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार महासंघ तयार करत असलेल्या जिल्ह्याच्या व्यापार धोरणात समाविष्ट करावयाच्या पर्यटन व्यवसाय विषयक बाबींवर निर्णय घेणे या विषयांवर चर्चा होणार आहे.

सभा वेळेत सुरू होईल व वेळेत संपेल. त्यामुळे सर्वांनी वेळेपूर्वी उपस्थित राहावे. सभेत फक्त पावसाळी पर्यटन व्यवसाय वाढीसाठीचे उपाय मांडायचे आहेत. वैयक्तिक व्यावसायिकांना प्रत्येकी दोन मिनिटांचा वेळ देण्यात येईल. प्रत्येक संघटनेच्या वतीने फक्त एका पदाधिकाऱ्याला बोलण्याची संधी मिळेल व त्याला एकूण पाच मिनिटांचा वेळ दिला जाईल. सभेचे कामकाज नियोजितरित्या संपन्न होण्यासाठी सर्वांनी वरील नियम पाळावे व सर्व पर्यटन व्यावसायिकांनी उपस्थित राहून सभेच्या कामकाजात सहभागी व्हावे, आवाहन व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स