मालवण नगरपरिषदेकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जनजागृती आणि वृक्षारोपणाचा उपक्रम.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण नगरपरिषद येथे ०५ जून रोजी मुख्याधिकारी तथा प्रशासक मा. संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण नगरपरिषद मार्फत कार्यालय परिसरात स्थानिक जातीचे वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच नगरपरिषद सभागृह येथे DAY-NULM महिला बचत गटांना (SHG) CDD India या संस्थे तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन’ या विषयावर जनजागृती कार्यशाळा राबविण्यात आली.
त्या अंतर्गत महिला बचत गटांना कापडी पिशव्या वितरीत करण्यात आल्या. तसेच या कार्यशाळेत पर्यावरणाविषयी प्रतिज्ञा घेण्यात आली. या वेळी मालवण नगपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)