कोळपे जि.प. मतदारसंघात शिवसेनेचा मेळावा संपन्न..!
खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य भाजप (राणे समर्थक) कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश….!
ब्युरो न्यूज | सावंतवाडी : कोळपे येथे झालेल्या भव्य अशा शिवसेना मेळाव्यात खासदार राऊत यांनी विरोधकांचा थेट समाचार घेऊन शिवसेनेत सामिल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले आहे. “राणे हे केवळ बाळासाहेबांमुळेच मुख्यमंत्री झाले.ते आज जे मंत्री आहेत ते केवळ फक्त बाळासाहेबांची पुण्याई आहे. त्यांनी केवळ स्वतःचा च विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. आपले मेडीकल कॉलेज वाचविण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेज ची मान्यता रद्द करण्यासाठी केलेली धडपड सर्व जिल्हा वासीयांना माहीत आहे. केंद्रीयमंत्री झाल्यावर जनतेला वाटत होते काही तरी शाश्वत विकास होईल परंतु यांनी फक्त केंद्रीय मंत्रिपदाचा वापर माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर आणि शिवसेनेवर टीका करण्यासाठी केला आहे. यामुळे भाजप पक्षात आपले वजन वाढून वरिष्ठांना खुश करण्यासाठी सध्या केविलवानी धपडपड चालू आहे. ती त्यांनी तशीच सुरू ठेवावी याचा फायदा महाविकास आघाडी सरकारला निश्चितच फायदा होईल. त्याचप्रमाणे तालुक्यातील विकास कामांच्या बाबतीत गेल्या 7 वर्षात अनेक ग्रामीण भागातील रस्ते, मुख्यमंत्रीसडक योजमधून तसेच, जिल्हा वार्षिक योजना, जनसुविधा, डोंगरी विकास योजना, स्थानिक खासदार निधी या सर्व योजनेमधून झालेली व होत असलेली विकासकामे ही तत्कालीन पालकमंत्री दिपकभाई केसरकर, सध्याचे पालकमंत्री उदय सामंत व या भागाचा खासदार म्हणून आम्ही सातत्याने वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून मार्गी लावलेली आहेत. कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व मुस्लीम बांधव, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आमच्या शिवसेना पक्षावर व आमच्यावर विश्वास ठेवून जाहीर प्रवेश केलात त्याबद्दल आपण शिवसेनेचा सचिव आणि स्थानिक खासदार या नात्याने आपले शिवसेना पक्षात स्वागत करून आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद देतो. यापुढील काळात या मतदारसंघातील जास्तीतजास्त विकास कामे मार्गी लावून आपले विविध प्रश्न लवकरात लवकर सोवडविण्याचा प्रयत्न करू “, असे प्रतिपादन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)