ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आमदार वैभव नाईक यांची राजस्थानातील भीलवाडा सरस डेअरीला भेट

आमदार वैभव नाईक यांची राजस्थानातील भीलवाडा सरस डेअरीला भेट

प्रकाशन: 28 Oct 2021 12:56 AM
वाचन संख्या 64

राजस्थानचे माजी पर्यावरण मंत्री रामलाल जाट यांच्यासोबत केली चर्चा…..

ब्युरो न्यूज | विवेक परब : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक हे नुकतेच आपल्या खाजगी दौऱ्यानिमित्त राजस्थान येथे गेले असताना त्यांनी या दौऱ्यादरम्यान राजस्थान येथील सर्वात मोठ्या असणार्‍या भीलवाडा येथील सरस दूध डेअरीला भेट दिली. व तेथील दूध संकलना सह दुग्धोत्पादनाची ही माहिती घेतली. आमदार वैभव नाईक यांना महाराष्ट्र शासनाकडून “एक्स” दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली असल्याने, राजस्थान दौऱ्या दरम्यान राजस्थान सरकार कडुनही आमदार वैभव नाईक यांना पोलीस सुरक्षा पुरविण्यात आली होती. या दौऱ्यादरम्यान नाईक यांनी सरस डेअरी येथील दूध संकलन, प्रक्रिया उद्योग या संबंधी सर्व माहिती घेत असतानाच राजस्थानचे माजी पर्यावरण, वन व खनिज मंत्री व या डेअरीचे विद्यमान चेअरमन रामलाल जाट यांची भेट घेत त्यांचा सोबतही राजस्थान मधील दुग्धोत्पादनात संदर्भात चर्चा केली. राजस्थान मधील सर्वात मोठ्या असणाऱ्या या डेअरी च्या नियमित कामकाजाबाबतही नाईक यांनी माहिती घेतली. या दौऱ्यादरम्यान नाईक यांनी राजस्थानमधील दुग्धोत्पादना संदर्भात व त्यावर अवलंबून असलेल्या अर्थकारणाच्या अनुषंगानेही माजी पर्यावरण मंत्री रामलाल जाट यांच्यासोबत चर्चा केली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स