मुसळधार पावसामुळे चौके गावात घराचे छप्पर कोसळून नुकसान.
मालवण | ब्यूरो न्यूज : चौके गावात गेले तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे चौके सम्यक नगर (चौके हायस्कूल जवळ) येथील रहिवासी श्रीमती कांचन काशीराम कदम यांच्या घराचे छप्पर कोसळून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. छप्पर कोसळल्याची माहिती मिळताच चौके सरपंच पी. के. चौकेकर यांनी घटनास्थळी भेट दिली आणि तातडीने तलाठी श्री. गुरव आणि पोलिस पाटील श्री. रोहन चौकेकर यांच्याशी संपर्क साधून पाहणी करण्यात आली.
तसेच कोसळलेल्या छप्पराचे पंचायत यादी करण्यात आली. नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत मिळावी असे आवाहन सरपंच श्री. चौकेकर यांनी केले आहे. श्रीमती कांचन कदम यांची आर्थिक परिस्थिती गरीब असून कोसळणाऱ्या पावसामुळे त्यांचे राहते घर जमीनदोस्त झालेले असून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.