शालेय विद्यार्थ्यांच्या आधार व्हॅलीडेशन व 'अपार आयडी' नोंदणीत मालवण तालुका राज्यात द्वितीय.
संबंधित कामांसाठीची पदं गेली १० वर्षे रिक्त असूनही बजावलेली कामगिरी.
मालवण | ब्यूरो न्यूज : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पहिली ते बारावीतील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ऑटोमेटेड परमनेंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री (अपार आयडी) तयार केली जात आहे. यात राज्य स्तरावर सिंधुदुर्ग जिल्हा अग्रेसर राहिला आहे. तालुकास्तरावर आधार व्हॅलीडेशन व ‘अपार आयडी’ नोंदणीत मालवण तालुक्याने राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विदयार्थ्यांच्या समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विदयार्थ्यांचे आधार कार्ड व विद्यार्थ्यांचे यु – डायस मधील नाव जुळवून व्हॅलीड केले जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांचे अपार आयडी क्रिएशन मध्ये १२ अंकी युनिक नंबर देत पालकांची आधारकार्डची लिंक करण्यात येते. यामुळे विद्यार्थ्यांची माहिती शैक्षणिक रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्यास मदत होते. तसेच शैक्षणिक प्रणालीत माहिती उपलब्ध होण्यास सुलभ होते.
समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून सर्व माध्यमांच्या व सर्व व्ययवस्थापनाच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचे डीजी लॉकर तयार करण्यात येत आहे. यात विदयार्थ्यांचे आवश्यक कागदपत्र हरवले तरीही ते या माध्यमातून ॲप अंतर्गत उपलब्ध होऊ शकतात. ही अपार नोंदणी प्रक्रिया संपूर्ण राज्यात राबविली जात आहे. या माध्यमातून विदयार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध होते.
‘अपार आयडी’ नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम क्रमांक तर तालुका स्तरावर मालवण तालुक्याने राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच विदयार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन प्रक्रियेतही मालवण तालुक्याने राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
आधार व्हॅलिड करणे व अपार आयडी तयार करणे यात राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त करण्याचा मालवण तालुक्याने २३२ शाळांमधील १०,५७३ विदयार्थ्यांपैकी १०,५४२ विदयार्थ्यांचे आधार व्हॅलिड करून ९९.७१ % एवढे काम पुर्ण केले. तर अपार आयडी मध्ये १०,५७३ विदयार्थ्यांपैकी १०,४९९ विद्यार्थ्यांचे अपार आयडी जनरेट करून ९९.३०% एवढे काम केले.
अपार आयडी करताना पालकांची परवानगी आवश्यक असते. त्यानुसार बैठका घेऊन परवानगी प्राप्त केल्या गेल्या. आधार कार्ड मध्ये नाव, पत्ता, यात असलेल्या चुका यामुळे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. यासाठी गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी आधार कार्ड दुरुस्ती बाबत विशेष शिबीरे घेण्यात आली. मेगा अपार दिवस या सवारूपात सर्व शाळात विशेष मोहीम घेण्यात आली. विशेष म्हणजे तालुक्यामध्ये एमआयएस (MIS -Co-ordnator) व डाटा ऑपरेटर ही दोन्ही पदे गेली १० वर्ष पेक्षा जास्त काळ रिक्त असताना सुद्धा मालवण तालुक्याने गटसाधन केंद्रातील कर्मचारी व तंत्रस्नेही शिक्षक यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच सर्व शिक्षक यांच्या सोबतीने उल्लेखनीय कामगिरी मालवणने केली आहे.
मालवण तालुक्याच्या उल्लेखनीय कामकाजाबद्दल कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक श्री. महेश चोथे यांनी मालवण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. संजय माने व गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी तंत्रस्नेही शिक्षक यांचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच सदर कामकाजासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. गणपती कमळकर, गटविकासअधिकारी शाम चव्हाण, जिल्हा संगणक प्रोग्रॅमर श्री. शत्रुघ्न चव्हाण, तंत्रस्नेही शिक्षक व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी विशेषतः श्री. विकास रुपनर व श्री. स्वप्नील पाटणे विशेषतज्ञ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. असे मालवण शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
अपार आयडी मुळे विदयार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, प्रगती अहवाल, शाळा बाह्य मुलांचा मागोवा घेणे, गळतीचे प्रमाण कमी करण्यात मदत करणे. यावर डिजिटल नियंत्रण करण्यात येईल. अपार आयडी डीजी लॉकरला जोडण्यात येईल. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील साध्य केलेले लक्ष, १० वी, १२ वी बोर्ड परीक्षा निकाल, हॉलिस्टिक रिपोर्ट कार्ड, करिक्युलर अकॉम्प्लिशमेंट ऑनलाईन पद्धतीने बघता येईल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून राज्यात अन्य शाळेत ऑनलाईन पाठवणे सुलभ होईल. अपार आयडी विद्या समीक्षा केंद्रात जोडून प्रगतीच्या दृष्टीने नवीन उपक्रम राबवणे सुलभ होणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)