ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मालवणात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवणात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी.

प्रकाशन: 14 May 2025 02:05 PM
वाचन संख्या 168

मानवता विकास परिषद यांच्या वतीने आयोजित कार्यक्रम.

मालवण | प्रतिनिधी : मानवता विकास परिषदच्या वतीने, १४ मे रोजी मालवण मधील लिलांजली सभागृह येथे ‘छत्रपती संभाजी महाराज जयंती’ साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करुन व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.

यावेळी मानवता विकास परिषदच्या वतीने मंचावर उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर मान्यवर ॲड. समीर गवाणकर, माजी नायब तहसीलदार आनंद मालवणकर व मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांच्या शौर्याबद्दल मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. कु. सार्थक वणकुद्रे याने शिवगर्जना सादर केली.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून ॲड. समीर गवाणकर, मानवता विकास परिषद संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत, नायब तहसीलदार आनंद मालवणकर, बिळवस ग्रामपंचायत माजी मानसी पालव, दादा वेंगुर्लेकर, उद्योजक संतोष नागवेकर, सौ. वणकुद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मानवता विकास परिषद संस्थापक अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरीत्राचे कथन केले. छत्रपती संभाजी महाराज यांची कार्यप्रणाली गावपातळीपासूनच अंमलात आणली तर राष्ट्र सक्षम होईल असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणेतून हिंदू धर्मरक्षक राष्ट्रपुरुष संत श्री. पाचलेगांवकर महाराज यांच्या मार्गदर्शनपर शिकवणीची माहिती कथन केली.

यावेळी बोलताना मान्यवर ॲड. समीर गवाणकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू धर्म रक्षणार्थ केलेल्या कार्याचा व छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरीत्राचा आढावा घेतला. अत्यंत अल्पवयात त्यांनी हिंदू धर्मरक्षणासाठी औरंगजेबाच्या धार्मिक जुलूमशाही विरुद्ध दंड थोपटले आणि तत्कालीन प्रबळ औरंगजेबाला ते शरण न जाता कसे लढले हे आजही जास्त महत्वाचे आहे असे त्यांनी नमूद केले.

यावेळी मान्यवर आनंद मालवणकर यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराज यांचे पराक्रम कणखरता शिकवतात आणि त्यांचे बुधभूषण ग्रंथ व अलौकीक साहित्य म्हणजे अनमोल ठेवा आहे.

या कार्यक्रमाला शिवप्रेमी, नागरीक यांची उपस्थिती होती. मानवता विकास परिषदेच्या वतीने उपस्थितांचे आणि कार्यक्रमासाठी सहकार्य केलेले माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, व्यावसायिक संजय गावडे, लीलांजली सभागृह व्यवस्थापन व सहकारी यांचे आभार मानण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स