ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचारी संघटनांचे बेमुदत उपोषण

विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचारी संघटनांचे बेमुदत उपोषण

प्रकाशन: 27 Oct 2021 01:43 PM
वाचन संख्या 44


उमेश परब / कणकवली : आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एस टी कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती सिंधुदुर्गच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यात एस टी महामंडळाचे राज्यशासनात विलगिकरण व्हावे, राज्यसरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता दिवाळी पूर्वी मिळाला पाहिजे, वाढीव घर भाडे ८, १६, २४ या दराने मिळाले पाहिजे, सर्व सण भत्ता १२५०० मिळालाच पाहिजे, वार्षिक वेतन वाढ २ टक्के वरून ३ टक्के मिळावा, न्यायालयाच्या आदेशानुसार ठरलेल्या तारखेला पगार मिळालाच पाहिजे आणि दिवाळी बोनस १५ हजार ५०० रुपये मिळालाच पाहिजे अशा मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले असून या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अजून तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी विभागीय सचिव इंटक पांडुरंग गावडे, इंटक कणकवली आगार अध्यक्ष गौरेश लोकरे, कामगार संघटना विभागीय सचिव विनय राणे, कामगार संघटना विभागीय अध्यक्ष अनंत रावले, कामगारसेना महिलाअध्यक्ष मानसी परब, कायदेशीर सल्लागार प्रकाश साखरे, इंटक अध्यक्ष अशोक राणे, इंटक सचीव आबा धुरी, अविनाश दळवी, मधू भगत, संतोष चव्हाण, संजय सावंत, रमाकांत जाधव, कृष्णा कुडतरकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स