ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
क्रीडा समन्वयक शिक्षक अजय शिंदे यांचा 'क्रीडा दूत' उपाधीने सन्मान.

क्रीडा समन्वयक शिक्षक अजय शिंदे यांचा 'क्रीडा दूत' उपाधीने सन्मान.

प्रकाशन: 09 Apr 2025 11:03 PM
वाचन संख्या 245

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र.

जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड व मान्यवर उपस्थित.

मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हाअधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते मालवणचे क्रीडा समन्वयक शिक्षक अजय शिंदे यांचा ‘क्रीडा दूत’ उपाधीने सन्मान करण्यात आला. क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने मालवण तालुक्यात क्रीडा समन्वयक हे पद यशस्वी गेली २५ वर्षे सलग सांभाळणारे शिक्षक अजय शिंदे हे, श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन संचलित डॉक्टर श्रीधर सिताराम कुडाळकर हायस्कूल येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, लिपिक श्री सुरेकर व जिल्ह्यातील तालुका समन्वयक नंदकिशोर नाईक, विजय मयेकर, हनुमान सावंत, संजय परब ,बयाजी बुरान, उत्तरेश्वर लाड हे क्रीडा समन्वयक उपस्थित होते.

श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष विलास झाड, उपाध्यक्ष भालचंद्र राऊत, सचिव महेश मांजरेकर, कार्याध्यक्ष कृष्णा बांदेकर, खजिनदार विनायक निवेकर, नंदिनी साटलकर यांनी श्री. शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स